सर्वसमावेशक महाराष्ट्राची वाटचाल….!

0
72
सौजन्य: डीजीआयपीआर

शिवसेनेचे हिंदुत्व आणि भाजपचे हिंदुत्व वेगळे आहे, हे समजून घेतले पाहिजे. शिवसेनेचे हिंदुत्व शिवरायांच्या मराठी प्रतिकातून स्फुरणारे आहे. तर भाजपाचे हिंदुत्व ‘बंच ऑफ थॉट’मधून स्फुरणारे आहे. शिवसेनेचे हिंदुत्व राज्याच्या पश्चिमेकडील प्रगत मुंबई नगरातून विकासलेले आहे तर भाजपचे हिंदुत्व राज्याच्या पूर्वेकडील मध्यभारताच्या नागपुरातील ठिकाणाहून हिंदी पट्ट्याच्या प्रेरणेतून विकासलेले आहे.

आर. एस. खनके, पुणे

लोकशाहीत सरकार हे तिथल्या जनतेला मायबाप सरकार वाटले पाहिजे. लोकांच्या यथार्थ अपेक्षा आणि त्यांचे प्रतिबिंब सरकारात दिसले पाहिजे. याला लोकाभिमुख सरकार म्हणतात. कल्याणकारी राज्य ते याच मार्गाने वाटचाल करत असते. महाराष्ट्राचा मागील पाच वर्षातला अनुभव पहिला तर अनेक स्तरावरून मायबाप ऐवजी भय सरकार अशी अनुभूती लेखक, विचारवंत आणि सामान्य जनतेला वाटू लागली. पण ही जनमनाची भयप्रद स्पंदने टिपायला इथली माध्यमे भानावर नसल्याने जनभावना माध्यमातून प्रकट झाल्याच नाहीत. चौथा स्तंभ सत्तेचा आधारस्तंभ झाला की जे होते, तोच देशस्तरावरचा कित्ता राज्यात गिरवला गेला. आणि माध्यमे लोकाभिमुख होण्याऐवजी पराङ्मुख झाली. Views आणि news ची जागा पर्सेप्शनने घेतली गेली.

मागच्या आठवड्यात झालेला शपथविधी हा संविधान मूल्यांविरोधी आहे असे सामान्य माणसालाही वाटू लागले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही मूल्यांची बूज राखली. हा प्रकार म्हणजे संसदीयलोकशाहीचा पराभव होता.परंतु न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने झालेली उलथापालथ आणि त्यातून शपथ विधीचे रूपांतर राजीनाम्यात झाले हा इथल्या न्यायालयीन लोकशाहीचा विजय होता. झाला प्रकार महाराष्ट्राच्या समृद्ध संसदीय लोकशाही परंपरेला साजेसा नक्कीच नव्हता. कर्नाटकनंतर महाराष्ट्राचे हसू झाले. प्रातर्विधीवेळी एकांतातला शपथविधी आणि सायंप्रार्थनेवेळी झालेला अनेकांतातला शपथविधी….ही दोन दृष्य लोकशाही मूल्यांचे राज्यातले कालचे आणि आजचे यथार्थ दर्शन घडवतात. याचे दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे आठवड्याच्या आतच या दोन्ही शपथविधीचे साक्षीदार होण्याचा आणि लोकशाही मूल्ये जपण्याची मुख्यमंत्र्यांना शपथ देण्याचा घटनात्मक अधिकार बजावणारे राज्यपाल एकच आहेत.

प्रातर्विधीवेळी एकांतातला शपथविधी आणि सायंप्रार्थनेवेळी झालेला अनेकांतातला शपथविधी….ही दोन दृष्य लोकशाही मूल्यांचे राज्यातले कालचे आणि आजचे यथार्थ दर्शन घडवतात. याचे दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे आठवड्याच्या आतच या दोन्ही शपथविधीचे साक्षीदार होण्याचा आणि लोकशाही मूल्ये जपण्याची मुख्यमंत्र्यांना शपथ देण्याचा घटनात्मक अधिकार बजावणारे राज्यपाल एकच आहेत.

हा महाराष्ट्र आहे…. देशाला संविधान देणारा आणि त्याची बूज राखणारा…. हे मराठी अंतरंग असलेल्या,  सह्याद्री-सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आणि कृष्णा,  गोदावरी, तापी,  वैनगंगेचे पाणी प्यायलेल्या अठरापगड मराठी जणांचा. महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या तख्तासमोर झुकलेला नाही. याचा इतिहास औरंगजेबाच्या दरबारापासून महाराष्ट्राला ज्ञात आहे. पण मागील पाच वर्षात मराठी पिंड सोडून राज्य दिल्लीच्या मागावर आणि वळणावर खूप चाललेय असेच मत सर्वसामान्य त्रयस्थ मराठी लोकांना वाटत असल्याचे बोलले जात होते. याचे भान लोकांना झाल्याने मराठी लोकांनी टांगता कौल दिला. आम्हाला गृहित धरू नका असेच जणू मराठी माणसाने ठणकावून सांगितले. कोल्हापुरातले विधानसभा निकाल याचे बोलके उदाहरण! आता स्थापन झालेले सरकार राज्याचे सर्वसमावेशक सरकार असल्याचे दिसत आहे. जनादेशानेच घोडेबाजार नियंत्रित केला. निवडणूकपूर्व मेगाभरती मनसबदार लोकांची होती. लोकशाहीत राजेशाहीतली सरदारकी नको म्हणत भल्या भल्यांना जनता जनार्दनाने लॊकशक्तीद्वारे पाणी पाजले. हे आगळे वेगळे वैशिष्ट्ये या निवडणुकीचे राहिले.

हा महाराष्ट्र आहे…. देशाला संविधान देणारा आणि त्याची बूज राखणारा…. हे मराठी अंतरंग असलेल्या,  सह्याद्री-सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आणि कृष्णा,  गोदावरी, तापी,  वैनगंगेचे पाणी प्यायलेल्या अठरापगड मराठी जणांचा. महाराष्ट्र कधीही दिल्लीच्या तख्तासमोर झुकलेला नाही. याचा इतिहास औरंगजेबाच्या दरबारापासून महाराष्ट्राला ज्ञात आहे. पण मागील पाच वर्षात मराठी पिंड सोडून राज्य दिल्लीच्या मागावर आणि वळणावर खूप चाललेय असेच मत सर्वसामान्य त्रयस्थ मराठी लोकांना वाटत असल्याचे बोलले जात होते.

शरद पवारांसारखा जाणता राजकारणी महाराष्ट्र सावरायला मैदानात उतरला आणि आज हे सत्तेचे राजकारण त्यांनी जिकूंन दाखवले. याचे पडसाद देशभर दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहेत, हे सांगायला नको. सर्वसमावेशक मराठी राजकारणासाठी लोकोत्तर भूमिका या वाढत्या वयात शरद पवारांनी करावी कारण महाराष्ट्राला समजणारा त्यांच्या एवढा जाणता नेता महाराष्ट्रात सध्या तरी दुसरा कोणी नाही. शिवसेनेच्या हिंदुत्वासोबत जुळवून घेतल्याची आणि शिवसेनेने दोन्ही काँग्रेससोबत घरोबा केल्याची टीका होत आहे. असे असले तरी यातला मोठा प्रेरणा घटक मराठी आहे आणि न्यायालयात कुठल्याही धर्मग्रंथावर हात ठेवून नव्हे तर संविधानाचीच शपथ घेऊन साक्ष दिली पाहिजे, असे सांगणारे बाळासाहेब ठाकरे होते, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.

शिवसेनेचे हिंदुत्व आणि भाजपचे हिंदुत्व वेगळे आहे हे समजून घेतले पाहिजे. शिवसेनेचे हिंदुत्व शिवरायांच्या मराठी प्रतिकातून स्फुरणारे आहे. तर भाजपाचे हिंदुत्व ‘बंच ऑफ थॉट’मधून स्फुरणारे आहे. शिवसेनेचे हिंदुत्व राज्याच्या पश्चिमेकडील प्रगत मुंबई नगरातून विकासलेले आहे तर भाजपचे हिंदुत्व राज्याच्या पूर्वेकडील मध्यभारताच्या नागपुरातील ठिकाणाहून हिंदी पट्ट्याच्या प्रेरणेतून विकासलेले आहे. घाटावरच्या पुण्या आणि मैदानातल्या नागपुरापेक्षा मुंबईची सामाजिक वीण वेगळी आहे. मराठी प्रेरणा मुंबईत आहे.तिघांनीही सर्वसमावेशक भूमिका घेऊन कालसापेक्ष बदल घडवून मराठी तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा अशा अपेक्षा मराठी लोकांच्या आहेत. शाहू, फुले, आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांची कास धरली तर संबंध महाराष्ट्राची ऊर्जा या सरकारला मिळवता येईल हे मात्र नक्की. त्यासाठी सत्तेचे शिलेदार किती समर्थ ठरतात हे येणारा काळच ठरवेल!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा