राज्य साहित्य-संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे; प्रज्ञा पवार, उत्तम कांबळेंची वर्णी

0
52
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय साहित्य क्षेत्रातील महत्त्वपुर्ण योगदान देणाऱ्या २९ सदस्यांची पुढ़ील तीन वर्षाच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नियुक्त सदस्यांचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यासंदर्भातील घोषणा मराठी भाषा विभागाने नुकतीच एका शासन निर्णयान्वये केली आहे.

नियुक्त सदस्यांची नावे अशीः सदानंद मोरे-अध्यक्ष, डॉ. प्रज्ञा दया पवार, अरुण शेवते, डॉ.रणधीर शिंदे, श्रीमती निरजा, प्रेमानंद गज्वी, डॉ. नागनाथ कोतापल्ले, प्रविण बांदेकर, श्रीमती मोनिका गजेंद्रगडकर, भारत सासणे, फ.मु.शिंदे, डॉ.रामचंद्र देखणे, डॉ.रविंद्र शोभणे, योगेंद्र ठाकूर, प्रसाद कुलकर्णी, प्रकाश खांडगे, प्रा. एल.बी.पाटील, पुष्पराज गावंडे, विलास सिंदगीकर, प्रा. प्रदीप यशवंत पाटील, डॉ. आनंद पाटील, प्रा. शामराव पाटील, दिनेश आवटी, धनंजय गुडसुरकर, नवनाथ गोरे, रविंद्र बेडकीहाळ,   प्रा. रंगनाथ पठारे, उत्तम कांबळे, विनोद शिरसाठ, डॉ. संतोष खेडलेकर.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा