फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत मोठी कपात, फडणवीसांची बुलेटप्रुफ गाडी काढली!

0
1319
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढून घेण्यात आली आहे.

 दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. फडणवीसांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा होती. ती काढून घेऊन वाय प्लस दर्जाची करण्यात आली आहे. यांच्या ताफ्यात सध्या बुलेटप्रुफ गाडी आहे. ती काढून घेण्यात आली आहे. फडणवीसांशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.

हेही वाचाः भाजपमध्ये घमासानः राजस्थानात वसुंधरा राजे समर्थकांची नवी संघटना, पक्षश्रेष्ठींना इशारा

राज ठाकरे यांना सध्या झेड दर्जाची सुरक्षा आहे. त्यात कपात करून ती आता वाय प्लस दर्जाची करण्यात आली आहे. फडणवीसांच्या सुरक्षा व्यवस्थेतून रात्री उशिरा पायलट वाहन आणि बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात आली आहे. काही मंत्र्यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. त्यात संजय बनसोडे, अस्लम शेख यांचा समावेश आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. टीव्ही९ ने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा