राज्यात सर्व शाळा- महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुटी, दहावी-बारावीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणेच

0
749
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबईः कोराना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा- महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुटी जाहीर केली आहे. मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पार पडणार आहेत.

 राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने राज्यात संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा १८९७ (२) लागू केला आहे. खबरदारीचे उपाय म्हणून कालच मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि ठाणे या सहा शहरांतील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरण तलाव, जीम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील सर्वच शाळा- महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने या संदर्भातील पत्र शिक्षण विभागाला पाठवले आहे. सुटीच्या काळात विद्यार्थ्यांनी घरातच रहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

 दहावी- बारावीच्या परीक्षांबरोबरच विद्यापीठांच्या परीक्षाही ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील, असेही  या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील सर्व महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा- महाविद्यालये या निर्णयानुसार बंद राहतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा