शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखांपर्यंत कर्जमाफीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

0
319
संग्रहित छायाचित्र.

नागपूरः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कोणत्याही अटी- शर्थीशिवाय दोन लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी देण्याची महत्वाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

नागपुरातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही महत्वाची घोषणा करण्यात आली. महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत ही घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत. या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची शेतकऱ्यांची कर्जेमाफ होणार आहेत.  प्रशासकीय कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्यामुळे नवी वर्षातील मार्च महिन्यापासून या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे. नियमित कर्जे भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही लवकरच नवीन कर्जमाफी योजना जाहीर केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 या कर्जमाफी योजनेअंतर्गतची रक्कम थेट शेतकर्‍यांच्या खात्यातच जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना बँकेच्या, सरकारी कार्यालयाच्या रांगेत उभे रहावे लागणार नाही, अस चिमटा भाजपला काढत अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले की, महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा विस्तृत तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी सुरु करणार. देवेंद्र फडणवीस आपल्या काळात विदर्भाचा  विकास झालेला नाही. तुम्ही काम केलेलं नाही असं मी कुठेही म्हटलेलं नाही. विदर्भाचा मी नातू आहे. आजोळचे आशिर्वाद माझ्यासाठी महत्वाचा आहे. विदर्भाच्या विकासात कुठलीही कसूर आम्ही ठेवणार नाही.  पंतप्रधान मंगोलियाला ४ लाख कोटी डॉलर देतात, मग महाराष्ट्राला का देऊ शकत नाहीत. मोदीजी हे भाजपाचे नाही, देशाचे पंतप्रधान ते जागतिक नेते आहेत.  प्रत्येक जिल्ह्यामध्ये CMO कार्यालय सुरु करणार. ते कार्यालय थेट मंत्रालयातील CMO कार्यालयाला जोडलेलं असेल. विदर्भाच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस मला तुमची मदत लागेल, विदर्भाचा तुमच्या इतका माझा अभ्यास नाही. आदिवासी बांधवासाठी दरवर्षी लोकसंख्येच्या प्रमाणात तरतूद करणार. अन्न प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्याचा विचार सुरू आहे. आदिवासी मुला-मुलींना चांगल्या दर्जाचे पौष्टिक अन्न देण्यासाठी मध्यवर्ती स्वंयपाकगृह स्थापन करणार, असेही ठाकरे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा