मराठवाडा- विदर्भातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ, क्षेत्राबाहेर दिलेल्या कर्जाचाही समावेश

0
121
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेव्दारे राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकरांकडून घेतलेली कर्जेही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी शासन निर्णय जारी झाला आहे.

 शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी त्यांनी परवानाधारक सावकरांकडून घेतलेली कर्जे माफ करण्यात आली असून कर्जाची ही रक्कम संबंधित सावकारांना देण्यात येणार आहे. परवानाधारक सावकारांनी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर कर्जे दिली असतील ती कर्जेही माफ करण्यात आली आहेत. यापूर्वी २०१५ मध्ये परवानाधारक सावकरांनी परवान्यात नमूद क्षेत्राबाहेर दिलेली कर्जे कर्जमाफी योजनेस अपात्र ठरवण्यात आली होती. या योजनेसाठी सरकारने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने ५ मार्च रोजी हा शासन निर्णय जारी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा