राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री, काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष, ठाकरेंसोबत प्रत्येकी दोन मंत्री घेणार शपथ

0
345
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला अखेर तीन तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर निश्‍चित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभेचे उपाध्यक्षपद तर काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पाटेल यांनी ही माहिती दिली. त्यामुळे राज्यात एकच उपमुख्यमंत्री असेल आणि तोही राष्ट्रवादीचाच असेल, हे स्पष्ट झाले आहे.

 सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाली. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत सत्तावाटपाच्या सूत्रावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उद्या गुरूवारी महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन मंत्री शपथ घेणार असल्याचेही पटेल यांनी सांगितले. राज्यपालांनी महाराष्ट्र विकास आघाडीला 3 डिसेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. त्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे लागणार आहे.विश्‍वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री पुढील मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. याच बैठकीत महामंडळे, कोअर कमिट्या आणि विधान परिषदेतील सदस्य आदी मुद्यांवरही चर्चा करून हे सर्व मुद्दे निकाली काढण्यात आल्याचेही पटेल यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा