राज्यात मेगा पोलिस भरतीः पोलीस शिपायांची १२ हजार ५२८ पदे भरणार

0
2
संग्रहित छायाचित्र.

मुंबई कोरोना संकटामुळे राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली असून बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाप्रसंगी महाविकास आघाडी सरकारने बेरोजगार तरूणांना आशेचा किरण दाखवत पोलीस दलात मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात लवकरच पोलीस शिपाई संवर्गातील १२ हजार ५२८ पदे भरली जाणार असून यानिमित्ताने राज्यातील तरुण-तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत राज्यात पोलीस शिपाई संवर्गातील १२ हजार ५२८ पदे भरण्याच्या प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु केली जाणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणांनी पोलीस खात्यात भरती होण्याचे स्वप्न साकार होणार आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. शिपाई संवर्गातील सर्व रिक्त पदे या प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. नवीन भरतीमुळे पोलीस दलावरील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे असणारा ताण हलका होणार आहे. नवीन भरती प्रक्रियेसाठी वित्त विभागाच्या ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयातून सूट देण्याचाही निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

पोलीस शिपाई संवर्गातील २०१९ या वर्षामधील ५२९७ पदे तसेच २०२० या वर्षामधील ६७२६६ पदे व मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२ हजार ५२८ पदे १०० टक्के भरण्यात येतील.

कोरोनाच्या काळात महाराष्ट्र पोलीस दल हे खंबीरपणे रस्त्यावर उभे राहिले. शेकडो पोलीस हे कोरोना पॉझिटिव्हही झाले, तब्बल दीडशेच्या आसपास पोलीस अधिकारी-कर्मचारी हे कोरोना काळात कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत.

मराठा आरक्षणाचे काय?: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या पाश्र्वभूमीवर या प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग व विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्रिमंडळाने गृह विभागाला दिल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा