तलाठी भरतीचा मार्ग मोकळाः सात जिल्ह्यांत निवड झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्त्या

0
135
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यामुळे रखडलेल्या राज्यातील तलाठी भरती प्रक्रियेचा मार्ग अखेर आज मोकळा झाला आहे. एसईबीसीच्या जागा सोडून राज्यातील सात जिल्ह्यांत निवड झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्ती पत्रे देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली.

मराठा आरक्षणामुळे राज्यातील तलाठी भरती प्रक्रिया रखडली होती. एसईबीसीच्या जागा सोडून उर्वरित उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही दिले होते. या भरती प्रक्रियेतील मराठा आरक्षणाच्या स्थगितीची अडचण आता दूर करण्यात आली असून एसईबीसी संवर्गातील पदे वगळता उर्वरित उमेदवारांना नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत.

बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर या सात जिल्ह्यात तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या तलाठीपद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एसईबीसी संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा