राज्यातील महापालिका क्षेत्रात महाविकास आघाडी सरकार उघडणार १०० दवाखाने

0
49
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्यातील गोरगरीबांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यातील महापालिका क्षेत्रांत १०० ठिकाणी ‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दावाखाना’ केंद्रे सुरू करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. यासाठी ७९५ लाख इतक्या प्रशासकीय खर्चासही सरकारने मान्यता दिली आहे.

राज्यातील गरीब जनतेला आरोग्य सेवा पुरवण्यासाठी याआधी ६० ठिकाणी आदरणीय बाळासाहेब ठाकरे ई निविदा काढण्यात येणार होत्या. ई निविदा प्रक्रियेमार्फत हे दवाखाने चालवण्यासाठी मान्यताही देण्यात आली होती. मात्र ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. प्रशासकीय मान्यतेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने आदेश काढावे लागत असल्याने या नवीन आदेशात १०० दवाखाने सुरू करण्यास मान्यता देऊन त्यासाठी निधीचीही तरतूद करण्यात आली.

प्रत्येक दावाखान्यासाठी वैद्यकीय अधिकारी, माहिती तंत्रज्ञान, औषधे, माहिती शिक्षण व संवादल, कार्यात्मक खर्च असा एकूण ७.९५ लाख भांडवली खर्च तर पायाभूत सुविधांसाठी एक लाखांचा खर्च मंजूर करण्यात आला असून ७९५ लाख एवढा खर्च मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक हे दावाखाना केंद्रे कुठे कार्यान्वित  करायचे याची जागा निश्चित करणार आहेत. त्यानंतर निविदा प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा