आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये आदित्य ठाकरेंना मंत्रिपदाची लॉटरी, आज घेणार शपथ

0
65
छायाचित्रः विकीपीडिया.

मुंबईः युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. आज दुपारी एक वाजता विधिमंडळाच्या प्रांगणात होणाऱ्या शपथविधी समारंभात ते कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 13 जून 1990 रोजी जन्मलेले आदित्य ठाकरे यांचे वय सध्या अवघे 29 वर्षे आहे. मंत्रिपदाची शपथ घेणारे ते महाविकास आघाडीच्या सरकारमधील सर्वात तरूण मंत्री असतील. आदित्य ठाकरे यांच्यावर नगरविकास खात्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तरूण चेहऱ्यांना संधी मिळत आहे. काँग्रेसनेही अमित देशमुख आणि सुनिल केदार या तरूण आमदारांना संधी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा