ऊर्जामंत्र्यांकडून ऐनदिवाळीत शॉकः सवलतीची आशा ठेवू नका, सगळेच वीज बिल भरावे लागणार!

0
221
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः लॉकडाऊनच्या काळात आधीच आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या राज्यातील नागरिकांना महावितरणने वाढीव वीज बिलाचा शॉक दिल्यानंतर आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दुसरा एक शॉक दिला आहे. वाढीव वीज बिलात सवलत दिली जाईल, असे राज्य सरकारकडून आजपर्यंत सांगितले जात होते. मात्र वीज बिलात कोणतीही सवलत देता येणे शक्य नसल्याचे सांगून राऊत यांनी वीज ग्राहकांना दुसरा एक शॉक दिला आहे.

लॉकडाऊन काळात महावितरणने राज्यातील वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वाढीव वीज बिले दिली. विशेष म्हणजे जे वीज ग्राहक लॉकडाऊन काळात प्रामाणिकपणे सरासरी वीज बिल भरत होते, त्यांनाही महावितरणने वाढीव बिलांचा शॉक दिला. लॉकडाऊन काळात आलेली अव्वाच्या सव्वा वाढीव वीज बिले कमी करून वीज ग्राहकांना सवलत द्यावी, अशी मागणी केली जात असतानाच राज्य सरकारकडून वीज बिलात सवलत दिले जाण्याचे संकते दिले जात होते. त्यामुळे आज ना उद्या वीज बिले कमी करून मिळतील, असे वीज ग्राहकांना वाटत होते. म्हणून ते वीज बिलेही भरत नव्हते.

आता ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. महावितरणचे जसे वीज ग्राहक आहेत, तसेच महावितरणही एक ग्राहक आहे, तसेच महावितरणही एक ग्राहक आहे. महावितरणला बाहेरून वीज विकत घ्यावी लागते. वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क द्यावे लागतात. महावितरणची सध्याची थकबाकी ३१ टक्के आहे. ग्राहकांकडून वीज बिल भरलेच जात नाही. त्यामुळे वीज बिलात सवलत दिली जाणे शक्य नाही, असे राऊत म्हणाले.

 ऊर्जा विभागातील कंपन्यांवर ६९ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. आता आणखी कर्ज काढणे अशक्य आहे. ग्राहकांना वीज बिलात दिलासा देता यावा यासाठी राज्य सरकारने खूप प्रयत्न केले. त्यासाठी केंद्र सरकारकडे मदतही मागितली. मात्र केंद्र सरकारने काहीही मदत दिली नाही. त्यामुळे वीज बिलात सवलत दिली जाऊ शकत नाही. मात्र कोणाचीही वीज कापली जाणार नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे. वीज बिलातील सवलतीबाबत आता मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असेही राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा