‘सरकार पाडण्याचे आणि आमदार फोडण्याचे सर्व प्रयोग कोसळले!’

0
1144
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः ‘सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वतःच्या अंतर्गत झगड्यातून पडेल, असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याचा सरळ अर्थ असा की, सरकार पाडण्याचे आणि आमदार फोडण्याचे सर्व प्रयोग कोसळले आहेत,’ असा टोला शिवसेनेने भाजपला हाणला आहे.

महाराष्ट्रातील ‘ठाकरे सरकार’ अंतर्विरोधातून पडेल, असे विरोधकांना का वाटते? तसे घडणार नाही. फडणवीस मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त अंतर्विरोधाचे प्रदर्शन शिवसेना- भाजपात घडले. पण तेव्हा सरकार टिकले. मंत्र्यांचे राजीनामे खिशात असतानाही ते तरले. मग आताच कसे पडेल?, असेही शिवसेनेने ‘सामना’ या मुखपत्राच्या अग्रलेखात म्हटले आहे.

सत्ताधारी घटक पक्षांच्या आमदारांतील कोणी घोडेबाजारात उभे राहिलेले नाही. त्यामुळे सरकार पडेल असे विरोधकांना वाटत असेल तर चुकीचे आहे. अंतर्विरोधाच्या ठिणग्या उडाल्या तरी सरकारला धोका नाही. हे सरकार टिकायला हवे ही सत्ताधारी महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाची मजबुरी आहे, असे सांगतानाच शरद पवार हे ‘ठाकरे सरकार’ स्थापनेचा पाया घालणारे प्रमुख नेते. सरकारच्या भवितव्याविषयी तेच खात्रीने सांगू शकतात. ठाकरे सरकार स्थिर आहे, असे त्यांचे म्हणणे कायम आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा