राजभवनाच्या बाहेर राजकारण करा, मग आम्ही दाखवून देऊः संजय राऊतांचे खुले आव्हान

0
293
संग्रहित छायाचित्र.

पुणेः राजभवन ही राजकारण करण्याची जागा नाही. त्यांनी बाहेर राजकारण करावे, आम्ही दाखवून देऊ, असे आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. सरकारलाच नव्हे तर राज्यपालांनाही शरद पवारांच्या सल्ल्याची गरज आहे, असेही राऊत म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवार हे आपल्या राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत.  त्यांचा सल्ला देशातील अनेक नेते घेतात. त्यामुळे सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असेल तर कोणाच्या पोटात का दुखतेय? त्यांचा जर सल्ला आपण घेतला नाही तर आपल्यासारखे आपणच करंटे. राज्यपालांनाही पवारांच्या सल्ल्याची गरज आहे. त्यामुळे त्यांना सल्ला देण्याची मी पवारांना विनंती करेन, असे राऊत म्हणाले.

 महाविकास आघाडीचे सरकार होणारच होते. निवडणुकीच्या आधीपासूनच हे सरकार असेच होईल, असे माझ्यासारख्या काही लोकांना वाटत होते. हे सरकार पंधरा दिवसांत पडेल, अशाही लोकांच्या पैजा लागल्या होत्या. परंतु या सरकारला एक वर्षे पूर्ण होत आहे. हे सरकार पूर्ण ताकदीने चालत आहे. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असेही राऊत म्हणाले.

सरकारसमोर आव्हाने निर्माण करणे हा विरोधकांचा अजेंडा आहे. ही आव्हाने आपण राज्यासमोर उभी करत आहोत, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. काहींना विरोधी पक्ष असूच नये, असे वाटते. पण चांगल्या विरोधकांचे स्वागत केले पाहिजे, या मताचा मी आहे. लोकशाहीत उत्तम विरोधक असायलाच हवेत, त्याशिवाय राज्य पुढे जात नाही, असे राऊत म्हणाले. बिहारमध्ये तेजस्वी यादव पूर्ण बहुमताने मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटायला नको, असेही राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा