कन्नडच्या औट्रम घाटात दरडी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू, मुंबईतही झाली आढावा बैठक

0
196
कन्नड घाटातील दृश्य.

औरंगाबाद/मुंबईः औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे औट्रम घाटात तीन ठिकाणी दरडी कोसळ्यामुळे औरंगाबाद- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून ही वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकामार्फत हे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, कन्नडमध्ये झालेली अतिवृष्टी आणि घाटात दरडी कोसळून निर्माण झालेली परिस्थिती या पार्श्वभूमीवर मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर आढावा बैठक घेण्यात आली.

आज पहाटे कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात तुफान पाऊस झाला. या दोन तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या ओट्रम घाटात तुफान पावसामुळे तीन ठिकाणी दरडी कोसळून अनेक वाहने अडकून पडली आहेत. स्थानिक प्रशासन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाच्या संयुक्त विद्यमाने कन्नडच्या औट्रम घाटात कोसळलेल्या दरडी आणि अकडलेली वाहने हटवण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आला आहे.

ओट्रम घाटात दरडी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान,कन्नड तालुक्यांत अतिवृष्टी आणि घाटातील भूस्सखलानामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य सरकारच्या मुंबईतील सह्याद्री आतिथीगृहावरील बैठकीत आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे कन्नड घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळून वाहतूक ठप्प आहे. काही भागात पावसामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीचा राज्य शासनाच्या वतीने आज आढावा घेण्यात आला. घाटातील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी थानिक प्रशासनाला सूचना करण्यात आल्या आहेत.

ज्या भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे, अशा ठिकाणी तत्काळ मदत पोहचविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पीडित नागरिकांना तत्काळ जीवनावश्यक वस्तू व आर्थिक मदत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली.

… तोपर्यंत करा या पर्यायी मार्गाचा वापरः औट्रम घाटातील दरड कोसळल्यामुळे अनेक वाहने अडकून पडली आहेत. कन्नड घाटात दरड कोसळ्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून कन्नड-पानपोई- चापानेर-शिऊर बंगला-नांदगाव-चाळीसगाव अशा पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

पहा व्हिडीओ

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा