बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९०.६६ टक्के!

0
138
संग्रहित छायाचित्र.

पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एचएससी) म्हणजेच बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेत ९०.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला राज्यभरातून १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी बसले होते.

आज दुपारी १ वाजेनंतर विद्यार्थांना पुढील संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येईल.

www.maharesult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com 

यंदा बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. मात्र, कोरोना संकटामुळे उत्तरपत्रिका तपासण्यास उशीर झाल्याने त्याचा परिणाम निकाल जाहीर करण्यावर झाला आहे.

गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे http://verifiation.mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाईटवरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल.गुणपडताळणीसाठी १७ जुलै ते २७ जुलैपर्यंत तर उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी १७ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन शुल्क भरून अर्ज करता येतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा