कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य नाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलली

0
25
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: ओमीक्रॉन विषाणू आणि कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या खबरदारी घेण्याच्या सूचनेच्या पार्श्वभूमीवर राज्य नाट्य स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाचा झपाट्याने वाढणारा संसर्ग पाहता ही स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती अनेक संघांनी ई मेलद्वारे व दूरध्वनीवरून केली होती. त्यामुळे येत्या १५ जानेवारीपासून सुरु होणारी राज्य नाट्य स्पर्धा तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे.

विषाणू संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाच्या त्यावेळी असणाऱ्या नियमांस अनुसरून नवीन वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कळवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा