जगातील गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी स्थापणार महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट फोरमः देसाई

0
34

मुंबई: जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फोरमची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज केली.

 न्यूयॉर्क इम्पायर स्टेट ऑफ डेव्हलपमेंट विभागाच्या भागीदारी  संचालिका लॉरेन मार्कल यांनी देसाई यांची भेट घेतली. यावेळी भारत व अमेरिकेदरम्यान व्यापार, गुंतवणूक वाढवण्यावर चर्चा करण्यात आली. नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात न्यूयॉर्कने महाराष्ट्र गुंतवणूक करावी, त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही देसाई यांनी दिली. जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फोरमची स्थापना करण्यात येणार असून त्यासाठी अमेरिकेतील कंपन्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महाराष्ट्र राज्य औद्योगिकदृष्ट्या प्रगतशील राज्य आहे. जगभरातील गुंतवणूकदार महाराष्ट्राची निवड करतात. त्यामुळे थेट परकीय गुंतवणुकीचे प्रमाणात 35 टक्के इतके आहे. येत्या काळात न्यूयॉर्क राज्याने महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांना सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल. सध्या राज्य सरकार डिजिटलायझेशनवर अधिक भर देत आहे. सरकारने नुकतेच ब्लॉक चेन सँड बॉक्स तंत्रज्ञान विकसित केले आहे. या क्षेत्रात महाराष्ट्रासोबत काम करावे, त्यांना आम्ही सर्व सुविधा देऊ, अशी ग्वाही देसाई यांनी दिली.

थेट परकीय गुंतवणूक वाढविण्यासोबत कृषी, जैव, विज्ञान, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात भारतासोबत  काम करण्याची न्यूयॉर्कची तयारी आहे. भारतातील गुंतवणूकदारांनी देखील न्यूयॉर्क राज्यात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, असे मार्केल यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा