राज्यात जानेवारीपासून लसीकरणाची तयारी, पहिल्या टप्प्यात देणार ३ कोटी नागरिकांना डोज

0
80
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः डिसेंबर अखेरीस सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींना केंद्र सरकारची अंतिम मान्यता मिळण्याची शक्यता असून, ही मान्यता मिळताच जानेवारीपासून राज्यात लसीकरणाची सुरुवात होईल. आमची संपूर्ण तयारी झाली आहे. कोल्ड स्टोरेज व १८ हजार लोकांचे  ट्रेनिंगही पूर्ण होतआहे. ज्यांना ही लस दिली जाणार आहे त्यांचीही यादी तयार असून, ज्यांना मेसेज येईल त्यांना ही लस मिळेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना लस दिली जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.

देशात आणि राज्यात कोरोनाच्या लसीकरणाची जोरदार पूर्वतयारी सुरु आहे. केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत मायक्रो प्लॅनिंग सुरु केले आहे. लस देण्यासाठीची कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आली आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्या संबंधीचा मेसेज त्या व्यक्तीला पाठवला जाईल. त्या व्यक्तीची लसीकरण केंद्रावर  ओळख पटवली जाईल व  त्यानंतर त्याला लस देण्यात येईल, असे टोपे म्हणाले.

लसीकरणाबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. हेल्थ वर्कर्स, अत्यावशक सेवेतील कर्मचारी, ५० वर्षांवरील नागरिक शिवाय इतर आजार असलेले ५० वर्षांवरील नागरिक यांची माहिती गोळा केली जाते आहे. राज्य सरकारचे १८ हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचे काम आता पूर्ण होईल. लसीच्या साठवणुकीसाठी कोल्डचेनची व्यवस्था झाली आहे. कार्यपद्धती ठरली आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्यासंबंधीचा मेसेज संबंधित व्यक्तीला येईल. तो येणार, त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार अशा प्रकारचे मायक्रो प्लॅनिंग सुरु असल्याचे टोपे यांनी सांगितले.

केंद्राने मोफत लस दिली नाही तर काय?: केंद्र सरकारने सर्व राज्यांना मोफत वीज उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी टोपे यांनी केली. केंद्राने मोफत लस दिली नाही तरी राज्य सरकार आपल्या जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगताना त्यांनी वेळ पडली तर राज्य सरकार हा भार उचलेल असे संकेत टोपे यांनी दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा