हिवाळी अधिवेशनास प्रारंभ, डॉ. प्रज्ञा सातव यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

0
116
संग्रहित छायाचित्र.

मुंबई:  विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आज सुरूवात झाली. विधान परिषदेत वंदे मातरम्‌ने दुपारी १२ वाजता कामकाजास सुरुवात झाली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह सन्माननीय मंत्री आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

नवनिर्वाचित सदस्य डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना विधान परिषद सदस्यत्वाची शपथ विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेच्या नवनियुक्त सदस्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांचा विधान परिषदेत सर्वांना परिचय करून दिला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा