राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती, डझनभर भाजप आमदार करणार प्रवेश!

0
628
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः भाजपच्या एकूणच कामकाज आणि व्यवस्थेला उबगलेले डझनभराहून अधिक भाजप आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

 दोन्ही हातांच्या बोटांवर मोजता येणार नाहीत, एवढे भाजप आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हे सगळे आमदार भाजपमध्ये नाराज असून त्यांना भाजपच्या एकूणच कामकाजाच्या पद्धतीचा उबग आला आहे. त्यातील बरेच जण तर आमच्याशी मोकळेपणाने बोलतही असतात, असे जयंत पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 हातकणंगले येथील माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत भाजपचे नगरसेवक, माजी नगराध्यक्षही राष्ट्रवादीत आले आहेत. आता लवकरच भाजपचे विद्यमान आमदारही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, असे पाटील म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा