‘फडणवीस सरकारचा मराठा आरक्षण कायदाच चुकीचा; ईडब्ल्यूएस आरक्षण घ्या, विषय संपवा’

0
440
संग्रहित छायाचित्र.

पुणेः फडणवीस सरकारने केलेला एसईबीसीचा मराठा आरक्षण कायदाच चुकीचा होता. घटनेच्या चौकटीत असे एका जातीसाठी वर्ग निर्माण करून दिलेले आरक्षण टिकूच शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाने ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा आणि हा विषय मिटवून टाकावा, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि मराठा आरक्षणाचे अभ्यासक प्रवीण गायकवाड यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. त्याबाबतचा शासन निर्णय तातडीने जारीही केला. मात्र मराठा समाजाच्या काही संघटनांनी या जीआरची होळी करून निषेध केला. प्रवीण गायकवाड यांनी मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत सरकारचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचाः मराठा समाजाच्या सवलतीला विरोध ही मेटे, संभाजीराजेंची राजकीय खेळीः चव्हाणांची टीका

नव्या घटना दुरुस्तीनुसार मराठा समाजाला विशेष प्रवर्ग म्हणून आरक्षण देणे शक्य नाही. त्यामुळे मराठा समाजाने ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठीच्या आरक्षणाचा लाभ घ्यावा आणि हा विषय मिटवून टाकावा, असे आवाहन करतानाच मराठा समाजातील मोठा वर्ग मराठा कुणबी आणि कुणबी मराठा म्हणून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहे, याकडेही प्रवीण गायकवाड यांनी लक्ष वेधले आहे.

सगळे खासगीकरण होत आहे. आरक्षणाच्या पलीकडेही खूप मोठी स्पर्धा आहे. आता ८५ टक्के नोकऱ्या त्यामुळे मराठा समाजाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीचे आरक्षण घ्यावे आणि आरक्षणाचा विषय मिटवून टाकावा, असे आवाहनही गायकवाड यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा