‘मोदींकडे संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही, मग या अभिनेत्री कोणते प्रश्न घेऊन भेटल्या?’

0
846
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर छत्रपती संभाजीराजे यांनी चारवेळा भेट मागूनही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना भेट न दिल्याचा मुद्दा आता गाजू लागला आहे. अभिनेत्रींना भेटीसाठी वेळ देणारे प्रधानमंत्री मोदी यांनी संभाजीराजेंना भेट न देणे हा महाराष्ट्राचा अवमान आहे. या अभिनेत्री मोदींना कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? असा सवाल काँग्रेसने केला आहे.

मराठा आरक्षणाचा विषय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हातात नाही. हा विषय राज्यांच्या सूचीमध्ये आहे. त्यामुळे प्रधानमंत्री मोदी संभाजीराजेंना भेटले नाहीत, अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली होती. त्यावरून काँग्रेसने भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

 प्रियांका चोप्रा आणि कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजीराजेंना भेटालया वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पहात होते. या अभिनेत्री कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले आहे.

महाराष्ट्रातील बॉलीवूडबद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही, हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणाऱ्या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे, असे टिकास्त्रही सावंत यांनी सोडले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा