लक्ष्मीकांत देशमुखांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा सल्लागार समिती, ३० जणांची सदस्यपदी वर्णी

0
73
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: राज्याचे राजभाषा मराठीचे धोरण ठरवण्यासाठी कायमस्वरुपी भाषा सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार पुनर्रचित भाषा सल्लागार समितीवर अध्यक्ष व सदस्यांची  नियुक्ती  तीन वर्षे किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंतच्या कालावधीसाठी असेल. या समितीचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख आहेत. यात समितीचे सदस्य सचिव म्हणून भाषा संचालनालयाचे संचालक असतील. या समितीवर शासकीय सदस्यही असणार आहेत. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ.पंडित विद्यासागर, सुरेश वांदिले, डॉ. गणेश चंदनशिवे यांच्यासह ३० जणांचा समितीत समावेश आहे.

या समितीवर सदस्य म्हणून डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. पंडित विद्यासागर, श्री. अनंत पां. देशपांडे, डॉ. सुहास पळशीकर, डॉ. केशव सखाराम देशमुख, डॉ. हरिश्चंद्र बोरकर, डॉ. गिरीश दळवी, डॉ. चिन्मय धारूरकर, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. वंदना महाजन, डॉ. प्रकाश परब, श्री. किशोर कदम, प्रा. मिलिंद जोशी, प्रा. वैजनाथ महाजन, डॉ. अनुपमा उजगरे, पृथ्वीराज तौर, पी.विठ्ठल, सुरेश वांदिले, अनिल गोरे, श्रीमती अनुराधा मोहनी, जयश्री देसाई, प्रणव सखदेव, प्रकाश होळकर, डॉ. विवेक घोटाळे, सयाजी शिंदे, डॉ. गणेश चंदनशिवे, जयंत येलुलकर, शमशुद्दीन तांबोळी, डॉ. राजीव यशवंते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

या समितीवर  अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव (मराठी भाषा विभाग), अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग), अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव (शालेय शिक्षण विभाग), अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव (उच्च व तंत्र शिक्षण विभाग),  मुंबईच्या राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव हे शासकीय सदस्य असतील. तर भाषा संचालनालयाचे सचिव हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

ही समिती पुढील तीन वर्षाकरिता असणार आहे. अध्यक्ष व अशासकीय सदस्यांचा कार्यकाल संपल्यानंतर नवीन अध्यक्षाची व सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार शासनाला असतील, असे कळवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा