सर्व माध्यमे, बोर्डांच्या शाळांत मराठी बंधनकारक; न शिकवल्यास संस्थाप्रमुखांना 1 लाखांचा दंड

0
109
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यातील सर्व माध्यमे आणि बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकवणे बंधनकारक करण्यात आले असून या नियमाचे उल्लंघन करणार्‍या शाळांच्या संस्थाप्रमुखांना 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. अशी कायदेशीर तरतूद असलेले विधेयकच राज्य सरकारने आज विधान परिषदेत मांडले. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर मराठी भाषा विषय शिकवण्यास टाळाटाळ करणे शाळेच्या संस्थाप्रमुखांना चांगलेच महागात पडणार आहे.

उद्या 27 फेब्रुवारीला रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जाणार असून त्याच्या पूर्वसंध्येलाच राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला. तत्पूर्वी विधानसभेतही या संबंधी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय शिकवणे सक्तीचे करण्यात येणार असल्याचे सांगितले.मराठी भाषा विषय अनिवार्यपणे शिकवण्यासाठी सीबीएससीसह विविध बोर्डांच्या शाळांच्या संस्थाप्रमुखांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी मराठी शिकवण्यास होकार दिला आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा