महापौरपदाचे आरक्षण जाहीरः राज्यातील 12 महापालिकांमध्ये दिसणार महिला कारभारणी

0
216
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई : राज्यातील महारपौरपदांचे आरक्षण बुधवारी जाहीर करण्यात आले. त्यात तब्बल 12 महानगर पालिकांचे महापौरपद विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे. औरंगाबाद, नवी मुंबई,पिंपरी-चिंचवड, चंद्रपूर, पनवेल, अकोल्याचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिला, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, मालेगावचे महापौरपद बीसीसी महिला, परभणी- अहमदनगर, वसई-विरारचे महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले असून मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरच आणि नाशिकचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.

राज्यातील अनेक महापालिकांच्या महापौरपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला होता. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे महापौरपदाच्या आरक्षण सोडतीला राज्य सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर बुधवारी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यामुळे महत्वाच्या शहरांच्या महापौरपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी म्हणून अनेकजण आतापासूनच मोर्चेबांधणीला लागणार आहेत.

महापालिका आणि आरक्षण

औरंगाबादः ओपन महिला

पनवेलः ओपन महिला

नवी मुंबई: खुला प्रवर्ग महिला

पिंपरी-चिंचवड: खुला प्रवर्ग महिला

चंद्रपूर: खुला प्रवर्ग महिला

अकोला: खुला प्रवर्ग महिला

भिवंडीः खुला प्रवर्ग महिला

जळगावः खुला प्रवर्ग महिला

नाशिक: खुला प्रवर्ग

मुंबईः खुला प्रवर्ग

पुणे: खुला प्रवर्ग

नागपूर: खुला प्रवर्ग

ठाणेः खुला प्रवर्ग

कल्याण डोंबिवली: खुला प्रवर्ग

उल्हासनगरः खुला प्रवर्ग

सांगली: खुला प्रवर्ग

नांदेड: ओबीसी महिला

सोलापूरः बीसीसी महिला

कोल्हापूर: ओबीसी महिला

मालेगाव: ओबीसी महिला

अहमदनगरः अनुसूचित जाती महिला

परभणीः अनुसूचित जाती महिला

लातूरः ओबीसी सर्वसाधारण

धुळे: ओबीसी सर्वसाधारण

अमरावतीः ओबीसी

वसई विरारः अनुसूचित जमाती

मिरा भाईंदरः अनुसुचित जाती

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा