‘महापारेषण’मध्ये मेगा भरती : ८ हजार ५०० पदे भरणार

0
321
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत मेगाभरती होणार आहे. या विभागातील ८५०० रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. तांत्रिक संवर्गातील ६ हजार ७५० पदे व अभियंता संवर्गातील १ हजार ७६२ पदांसाठी ही भरती होणार असून या निर्णयामुळे बेरोजगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत डॉ. राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी या भरतीत निर्माण होणार आहे. यासोबतच बक्षी समितीच्या शिफारशीनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबवण्यात यावी व राज्य सरकारला मंजूरपदाचा  नवीन आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


यंत्रचालक, तंत्रज्ञ संवर्ग एकत्रीकरणः यंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्गाचे एकत्रीकरण करण्याचा निर्णयही डॉ. राऊत यांनी घेतला आहे. यामुळे कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार आहे. बदलत्या गरजेनुसार नवीन कौशल्य निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अनेक वर्षे पदे रिक्त असल्याने पदोन्नतीमध्ये निर्माण झालेली कुंठित अवस्था या मेगा भरतीमुळे संपुष्टात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा