डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमधून बाहेर पडताच पत्नी मेलानिया ट्रम्प घेणार घटस्फोट!

0
3539
संग्रहित छायाचित्र.

वॉशिंग्टनः  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सपशेल पराभूत होऊनही विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव मान्य करण्यास नकार दिला असतानाच त्यांच्या कुटुंबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमधून बाहेर पडताच त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प त्यांच्यापासून घटस्फोट घेणार असल्याचा दावा डेली मेलने त्यांच्या एका माजी सहकाऱ्याचा हवाला देऊन केला आहे.

 डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, मेलानिया ट्रम्प यांच्या माजी सहकारी स्टेफनी वोल्कॉफ यांनी दावा केला आहे की, मेलानिया ट्रम्प विवाहानंतरच्या कराराबाबत आता ट्रम्प यांच्याशी चर्चा करत आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवासस्थानात ट्रम्प आणि मेलानिया यांच्या वेगवेगळ्या बेडरुम असल्याचा दावाही वोल्कॉफ यांनी केला आहे. मेलानिया आणि ट्रम्प यांचा विवाह ‘व्यावहारिक’ असल्याचाही वोल्कॉफ यांचा दावा आहे.

हेही वाचाः अमेरिकेत सत्तासंघर्ष तीव्रः निकाल मान्य करण्यास डोनाल्ड ट्रम्प यांचा नकार, म्हणाले माझाच विजय!

 दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी राजकीय सहकारी ओमारोसा मॅनिगॉल्ट यांनी ट्रम्प आणि मेलानिया यांचे १५ वर्षे जुने वैवाहिक जीवन संपुष्टात आल्याचा दावा केला आहे. मेलानिया आता प्रत्येक मिनिटाची गिनती करू लागल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमधून बाहेर पडताच मेलानिया ट्रम्प यांना घटस्फोट देतील. मेलानिया ट्रम्प यांचा बदला घेण्यासाठी मेलानिया नवीन मार्ग शोधत आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.

संग्रहित छायाचित्र.

 ट्रम्प आणि मेलानियाची अशी झाली होती भेटः ट्रम्प आणि मेलानिया यांची प्रेमकथा १९९८ मध्ये सुरु झाली. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प ५२ वर्षांचे होते तर मेलानिया २८ वर्षांच्या होत्या. त्यावेळी न्यूयॉर्कमध्ये फॅशन वीक सुरु होता. त्याच्यानंतर टाइम्स स्क्वेअरच्या किटकॅट क्लबमध्ये एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत ट्रम्प आणि मेलानिया दोघेही सहभागी झाले होते. दोघांची नजरानजर झाली आणि दोघांचे बोलणे-चालणे सुरु झेल. त्यानंतर २००४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलानियाला १.५ मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांत ११,०९,७१,७२५ रुपये किंमतीची महागडी डायमंड रिंग घालून मेलानियाला लग्नासाठी प्रपोज केले. त्यानंतर २२ जानेवारी २००५ रोजी त्यांचा विवाह झाला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा