व्हिडीओः स्कूलबसमध्ये घुसून गतीमंद मुलीची छेड काढून विनयभंग, गुंडाचे टोळके मोकाट!

11
72507

औरंगाबादः वळदगाव परिसरातील स्वयंसिद्धा संस्थेच्या गतीमंद मुलांच्या शाळेच्या स्कूलबसमध्ये घुसून काही टवाळखोरांनी एका अल्पवयीन मुलीची छेड काढून विनयभंग केल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे ती चिमुरडी प्रचंड घाबरली असून तिच्या निरागसतेचा गैरफायदा घेऊन छेडछाड करणारे नराधम मात्र मोकाट आहेत.

 औरंगाबाद जिल्ह्यातील वळदगाव परिसरात स्वयंसिद्धा संस्थेतर्फे गेल्या वीस वर्षांपासून गतीमंद मुलांची शाळा चालवण्यात येते. या शाळेच्या बसमध्ये घुसून काही टवाळखोर निर्लज्जपणे एका अल्पवीय गतीमंद मुलीची छेड काढून विनयभंग करत आहेत. स्कूलबसच्या चालकाच्या उपस्थितीतच हा अश्‍लाघ्य प्रकार सुरू आहे, हा सगळा प्रकार व्हायरल व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. टवाळखोर गुंडाचे हे टोळके मुलीची छेड काढून विनयभंग करूनच थांबत नाहीत तर या किसळवाण्या प्रकाराचे चित्रिकरण करून त्याचा व्हिडीओही व्हायरल करतात. व्हिडीओ व्हायरल होऊनही हे गुंड मोकाट आहेत.

11 प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा