नारायण राणे, डॉ. भागवत कराडांसह महाराष्ट्रातील चौघे मोदी मंत्रिमंडळात, ३६ नव्या चेहऱ्यांना संधी

0
121
छायाचित्रेः पीआयबी

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राष्ट्रपती भवनात ४३ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यात १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या नव्या मंत्र्यांना शपथ दिली. या विस्तारात महाराष्ट्रातील नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले तर कपील पाटील, डॉ. भारती पवार आणि डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रिपद मिळाले. या नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झालेले नाही. मात्र केंद्र सरकारने नव्यानेच स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाची जबाबदारी नारायण राणे यांच्याकडे दिली जाईल, अशी शक्यता आहे.

या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या ३६ चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर ७ विद्यमान मंत्र्यांना बढती देण्यात आली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी १२ मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. त्यात महाराष्ट्रातील प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे या दोन मंत्र्यांचा समावेश आहे.

कॅबिनेट मंत्री

 • नारायण राणे
 • सर्बानंद सोनोवाल
 • डॉ. वीरेंद्र कुमार
 • ज्योतिरादित्य शिंदे
 • आर.सी.पी. सिंह
 • अश्विनी वैष्णव
 • पशुपती पारस
 • किरण रिजिजू
 • आर.के. सिंह
 • हरदीप पुरी
 • मनसुख मंडाविया
 • भूपेंद्र यादव
 • पुरूषोत्तम रूपाला
 • जी. किशन रेड्डी
 • अनुराग ठाकूर

 राज्यमंत्री

 • पंकज चौधरी
 • अनुप्रिया पटेल
 • एस.पी. सिंह बघेल
 • राजीव चंद्रशेखर
 • शोभा करंदलाजे
 • भानुप्रतापसिंह वर्मा
 • दर्शना जरदोश
 • मीनाक्षी लेखी
 • अन्नपूर्णा देवी
 • ए. नारायण स्वामी
 • कौशल किशोर
 • अजय भट्ट
 • बीएल वर्मा
 • अजय कुमार
 • देवुसिंह चौहान
 • भगवंत खुबा
 • कपील मोरेश्वर पाटील
 • प्रतिमा भौमिक
 • डॉ. सुभाष सरकार
 • डॉ. भागवत कराड
 • डॉ. राजकुमार रंजन सिंह
 • डॉ. भारती पवार
 • बिश्वेश्वर टूडु
 • शांतनू ठाकुर
 • डॉ. मुंजापारा महेंद्रभाई
 • जॉन बारला
 • डॉ. एल. मुरूगन
 • निसिथ प्रमाणिक

 या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदींनी गेली दीडमहिने बरीच कसरत केली. मागील काही दिवसांत त्यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशीही त्यांनी नवीन मंत्र्यांबाबत बराच विचारविनिमय केला होता.

यांना मंत्रिमंडळातून डिच्चूः

 • डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय आरोग्य मंत्री.
 • प्रकाश जावडेकर, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री
 • रवि शंकर प्रसाद, केंद्रीय कायदा मंत्री.
 • बाबुल सुप्रियो, राज्य मंत्री, पर्यावरण मंत्रालय.
 • देबोश्री चौधरी, महिला आणि बाल विकास राज्य मंत्री.
 • रमेश पोखरियाल निशंक, मानव संसाधन विकास मंत्री.
 • सदानंद गौडा, रसायन व खते मंत्री.
 • संतोष गंगवार, श्रम आणि रोजगार मंत्री (स्वतंत्र प्रभार).
 • संजय धोत्रे, राज्यमंत्री, शिक्षण तसेच माहिती व तंत्रज्ञान मंत्रालय.
 • रतन लाल कटारिया, राज्यमंत्री, जलशक्ती मंत्रालया.
 • प्रताप सारंगी, राज्यमंत्री, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यागासहीत पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्रालय.
 • थावर चंद गहलोत, सामाजिक न्यायमंत्री.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा