एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

0
172

मुंबईः राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) येत्या रविवारी, ११ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमपीएससीच्या अधिकाऱ्यांसोबत बोलावलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आ

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे या महिन्यात येत्या रविवारी होऊ घातलेली एमपीएससीची राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या महिन्यातील सर्वच परीक्षा पुढे ढकला, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही आज मुख्यमंत्री ठाकरे यांना फोन करून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

अडीच लाख उमेदवारांना कोरोनाची बाधाः यापूर्वी राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा स्थगीत केली होती, तेव्हा भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षेला बसणाऱ्या अडीच लाख मुलांना कोरोना झाला आहे. त्यामुळेच परीक्षा रद्द करा, अशी मागणी आता होऊ लागली आहे, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या निर्णयापूर्वी सांगितले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा