शरद पवार ईडीच्या कार्यालयात शुक्रवारी स्वतःहोऊन जाऊन ‘पाहुणचार’ स्वीकारणार

1
81

मुंबईः राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळाप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह बँकेच्या संचालक मंडळावर राहिलेल्या 70 राजकीय नेत्यांवर मंगळवारी गुन्हे नोंदवल्यानंतर बुधवारी शरद पवारांनी स्वतःहोऊनच ईडीच्या कार्यालयात जाण्याची तारीख व वेळ जाहीर केली आणि ईडीचा पाहुणचार स्वतःहोऊन घेण्याची तयारी असल्याचेही स्पष्ट केले.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, ईडीने माझ्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. ईडीच्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य करणार आहे. शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता मी स्वतःहोऊनच ईडीच्या मुंबईतील कार्यालयात जाणार आहे. माझ्याकडून ईडीच्या अधिकार्‍यांना जी काही माहिती हवी असेल ती देईनच शिवाय ईडीला सहकार्य करण्यासाठी माझे हात सदैव तत्पर असतील, असेही शरद पवार म्हणाले. मी नक्की काय गुन्हा केला, हे मलाही समजून घेतले पाहिजे. मी राज्य सहकारी बँकेचा संचालक कधीच नव्हतो. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राने कधीही शिकवलेला नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांच्यांवर आस्था असलेला आणि संविधानावर विश्‍वास ठेवणारा मी व्यक्ती आहे, असेही शरद पवार म्हणाले.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा