‘देशभक्त’ कंगना रणौतने केले मुंबईत बेकायदेशीर बांधकाम, महापालिका चालवणार हातोडा!

0
669
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करून मुंबई आणि महाराष्ट्राचाही अपमान करणारी अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईच्या पालीहिल भागात बेकायदेशीर बांधकाम केल्याचे उघडकीस आले आहे. मुंबई महापालिकेने तिला याबाबत नोटीस बजावली असून तिने स्वतःहोऊन हे बेकायदेशीर बांधकाम तोडले नाही तर मुंबई महापालिका हातोडा चालवून हे बांधकाम तोडू शकते.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तिच्यावर चौफेर टीका झाली होती. तरीही ९ सप्टेंबरला मी मुंबईत येतेय, हिम्मत असेल तर रोखून दाखवा, असे आव्हानच तिने महाराष्ट्राला दिले होते. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तिला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली. त्यामुळे तिची हिम्मत आणखीच वाढली आणि  तिने स्वतःला ‘देशभक्त’ संबोधले होते.

हा सर्व वाद सुरू असतानाच मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी कंगनाच्या पालीहिल भागातील ‘मणिकर्णिका’ या कार्यालयाची पाहणी करून मोजणी केली होती. कार्यालयाचे मोजमाप घेऊन बेकायदेशीर बांधकाम झाले आहे का, याचीही तपासणी केली होती.

आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिला कलम ३५४ अंतर्गत नोटीस बजावली आहे. या नोटिसीनुसार बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या व्यक्तीने स्वतःहोऊन ते बांधकाम तोडून टाकले नाही तर महापालिका हातोडा चालवून हे बेकायदेशीर बांधकाम तोडू शकते. त्यामुळे कंगनाच्या अडचणी वाढल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा