मुस्लिम बाबराचे नव्हे तर दाते, गोडसे, गाडगीळांचे वंशजः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा दावा

0
6888
संग्रहित छायाचित्र.

कणकवलीः भारतातील मुस्लिम हे काही बाबराचे वंशज नाहीत. कुणी तरी आक्रमण केले आणि ते मुस्लिम झाले. हे मुस्लिम आपल्या कोकणातील गोडसे, गाडगीळ किंवा दाते होते, असा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कणकवलीतील एका सभेत केला आहे.

भाजपच्या वतीने कणकवली येथे कृषी कायदे समर्थन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बाबर हा काही भारतातील मुस्लिमांचा वंशज नव्हता, हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुस्लिमांना समजून सांगितले. अरे बाबा तुम्ही इथलेच. आपले कोकणातील स्थानिक गोडसे, गाडगीळ किंवा दाते. कुणी तरी आक्रमण केले आणि ते मुस्लिम झाले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेही वाचाः भक्तांनी घडवलेल्या हिंसाचाराचा ट्रम्प यांच्याकडून निषेध, परंतु चिथावणीखोर भाषणावर मौन

नरेंद्र मोदींनी रामजन्मभूमी मुक्त केली. आता तीन वर्षांत मंदिर होणार आहे. मंदिर वहीं बनाएगें हे आता पूर्ण झाले आहे. अजून काही बाकी आहे. ते २०२४ नंतर पूर्ण करायचे आहे आणि ते करणार, असे सांगतानाच विरोधकांना त्याचीच भीती वाटते. आता ५५ आहेत तर पाचच येतील, अशी त्यांना भीती वाटते. दुसरे काही नाही. शेतकऱ्यांविषयी कळवळा वगैरे काही नाही, असे पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा