प्रा. राजन शिंदेंचा मारेकरी अखेर गजाआड; नऊ महिन्यांपासून केला प्लॅन, गुगलवर घेतला शोध!

0
4058
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः  बहुचर्चित प्रा. राजन शिंदे यांच्या खूनाचे गूढ उकलण्यास अखेर पोलिसांना यश आले आहे. तब्बल आठ दिवसांनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून हा आरोपी प्रा. शिंदे यांचा निकटवर्ती आणि अल्पवयीन असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे मारेकरी गेल्या नऊ महिन्यांपासून प्रा. शिंदे यांचा खून करण्याचा प्लॅन करत होता. कोणत्या ठिकाणी मारले म्हणजे माणूस पटकन मरतो, याचा त्याने खून करण्यापूर्वी गुगलवर शोध घेतल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.

औरंगाबादच्या मौलाना आझाद महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजन शिंदे यांचा त्यांच्या एन-२ परिसरातील तुकाबानगरातील राहत्या घरी निर्घृण खून करण्यात आला होता. सोमवारी, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या खूनाचा तपास करणे पोलिसांसमोर एक आव्हान होते. या खूनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी एक खास पथक बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, पुणे आणि उस्मानाबादपर्यंत जाऊन आले होते.

चला उद्योजक बनाः सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी १ कोटीपर्यंत प्रोत्साहन योजना, वाचा सविस्तर माहिती

 हा मारेकरी प्रा. राजन शिंदे यांचा निकटवर्ती असून त्याने हत्येसाठी वापरलेले डंबेल्स, चाकू आणि रक्ताने माखलेला टॉवेल पोलिसांनी हस्तगत केला आहे. (हा मारेकरी अल्पवयीन असल्यामुळे त्याचे नाव प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.) मारेकऱ्याने हत्येसाठी वापरलेल्या या वस्तू घरापासून शंभर मीटरवर असलेल्या एका विहिरीत टाकल्या होत्या. पोलिसांनी तब्बल तीन दिवस या विहिरीतील पाणी उपसून ही हत्यारे जप्त केली आहेत.

सिडको एन-२ भागातील तुकाबानगर या हायप्रोफाइल सोसायटीत प्रा. शिंदे यांचा खून झाला. या खून प्रकरणात पोलिसांनी शिंदे कुटुंबीयांची दहा तास चौकशी केली होती. मात्र त्यातून पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागत नव्हते. पोलिसांनी या खूनाचे गूढ उलगडण्यासाठी तपासाच्या विविध पद्धती वापरल्या. तांत्रिक आणि भावनिक तपास तंत्राचाही वापर केला. अखेर प्रा. शिंदे यांच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आणि या खूनाचे गूढ उकलले आहे.

हेही वाचाः प्रा. राजन शिंदे खून प्रकरणाचे गूढः पिक्चर तयार, रिलिज होणेच बाकी!

कसा केला खून?: प्रा. राजन शिंदे हे रविवारी रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास घरी आले. तेव्हा त्यांचे निकटवर्तीय जागेच होते. कोणी टीव्ही पहात होते तर कोणी वेबसिरीज पहाज होते. प्रा. शिंदे यांनी घरी येताच अभ्यासावरून मुलांना टोकले. त्यातून त्यांच्याच वाद झाला. वाद वाढत गेला. तेव्हाच प्रा. शिंदे यांच्या निकटवर्तीयाने त्यांचा आजच काटा काढायचा असे ठरवले.

 या वादानंतर प्रा. शिंदे हे बैठकीच्या खोलीत गाढ झोपी गेले असता पहाटे दोन ते चारच्या दरम्यान मारेकऱ्याने व्यायामासाठी वापरण्यात येत असलेल्या डंबेल्सने त्यांच्या डोक्यात वार केले. त्यातील एक वार कानाजवळ लागल्याने प्रा. शिंदे यांचा अर्धा कान तुटला. या फटक्यात प्रा. शिंदे निपचित पडल्यानंतर आधीपासूनच त्यांचा प्रचंड द्वेष करणाऱ्या निकटवर्तीयाने किचनमधून चाकू आणून त्यांचा गळा चिरला. हाताच्या नसा कापल्या. निर्घृणपणे खून करण्याची ही पद्धत पाहून पोलिसही चक्रावून गेले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा