महिला पत्रकाराविरुद्ध अश्लील शेरेबाजी, भाजपचा आयटी सेलप्रमुख गजाआड

0
277

नाशिकः मुंबईतील एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराविरुद्ध अश्लील शेरेबाजी करून दमबाजी करणाऱ्या भाजपच्या आयटी सेलप्रमुखाविरुद्ध गुन्हा दाखल करून नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

या महिला पत्रकाराने नाशिक पोलिसांकडे ईमेलद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीवरून नाशिक ग्रामीणच्या ओझर पोलिसांनी विजयराज जाधव याच्याविरुद्ध विनयभंग, दमबाजी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला उमराने येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. जाधव हा भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख असून तो ओझर येथील एचएलमध्ये कार्यरत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा