राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, महाविद्यालयात आता ‘एनसीसी स्टडीज’ हा वैकल्पिक विषय

0
87
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः  देशातील नागरीसेवा, सैन्य दलासह इतर संरक्षण दल आणि पोलिस दलातील राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यांच्यात देशप्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी एनसीसी स्टडीज हा विषय राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि सर्व संलग्नित महाविद्यालयात सुरू करण्यास मान्यता आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

नागरी सेवा, सैन्य दल, पोलिस आणि इतर संरक्षण दलात विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासह त्यांच्यात देशप्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी एनसीसी स्टडीज हा विषय वैकल्पिक विषय म्हणून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

आवश्य वाचाः  सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ

नागरी सेवा आणि देशातील इतर संरक्षण दलामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. विदयार्थ्यांमध्ये देशप्रेमाची जाणीव आणि शिस्तबद्धता निर्माण होण्याच्या दृष्टीने आणि लष्करी सेवेबाबत आकर्षण निर्माण होण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांना सैन्य दलाचे प्राथमिक प्रशिक्षण या माध्यमातून मिळणार आहे, असेही सामंत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा