अयोध्येतील राम मंदिरासाठी ट्रस्ट, मग मशिदीसाठी का नाही?: शरद पवारांचा लखनऊमध्ये सवाल

0
122
संग्रहित छायाचित्र.

लखनऊ: अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची (ट्रस्ट) स्थापना केली आहे. मग तुम्ही मशिदीच्या निर्मितीसाठी असा ट्रस्ट का स्थापन करू शकत नाही?, असा सवाल करत मशिदीच्या निर्मितीसाठीही ट्रस्टची स्थापना झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या जिल्ह्यातील धानीपूर खेड्यात मशीद उभारण्यासाठी ५ एकर जागा दिली आहे. हे ठिकाण अयोध्येपासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. लखनऊ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यातपवार बोलत होते. आप मंदिर बनाने के लिए ट्रस्ट बना सकते, तो मशीद, जिस पे हमला हुआ, जिसकी शहादत हुई, उसके लिए ट्रस्ट क्यों नही बना सकते? (तुम्ही राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करू शकता, तर मशीद जी पाडली गेली आहे, त्या मशिदीच्या उभारणीसाठी का निर्माण करू शकत नाही? )  असे पवार म्हणाले. देश तर सर्वांसाठी आणि सर्वांचा आहे. भाजप लोकांना जातीय राजकारणात गुंतवून फूट पाडत आहे, असेही पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे उत्तर प्रदेश राज्य अध्यक्ष के. के. शर्मा यांनी सांगितले की, पवारांचा राम मंदिराला पाठिंबा आहेच. परंतु जसे राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन केला तसाच ट्रस्ट मशिदीच्या उभारणीसाठीही झाला पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा