कोरेगाव- भीमा हिंसाचारप्रकरणी ४ एप्रिलला शरद पवारांची चौकशी आयोगासमोर साक्ष

0
85
संग्रहित छायाचित्र.

पुणेः कोरेगाव- भीमा हिंसाचारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चौकशी आयोगाने समन्स पाठवले असून ४ एप्रिल रोजी साक्षीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

२०१८ मध्ये कोरेगाव- भीमामध्ये झालेल्या हिंसाचाराची कारणे चौकशी आयोगाकडून शोधली जात आहेत. चौकशी आयोगाचे अध्यक्ष न्या. जे. एन. पटेल यांनी शरद पवार यांची चौकशी केली जाणार असल्याचे आधीच सांगितले होते. शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन कोरेगाव-भीमा हिंसाचारात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची नावे घेतली होती. या दोन्ही प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी, अशी मागणीही पवारांनी केली होती. पवारांकडे कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणाची माहिती कुठून आली, याबाबत आता त्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा