शरद पवार- सोनिया गांधी भेटीत उद्या ठरणार सत्तेचा फॉर्म्युला, मंगळवारी फुटणार राज्यातील सत्ताकोंडी?

0
191
संग्रहित छायाचित्र.

पुणेः राज्यातील राष्ट्रपती राजवट संपवून लवकरात लवकर पर्यायी स्थापन करण्याचा महत्वाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे उद्या ( सोमवारी) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यातील सत्तेचा फॉर्म्युला निश्चित होईल. त्यानंतर मंगळवारी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संयुक्त बैठक घेऊन सरकार स्थापनेबाबत निर्णय घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. उद्या ( सोमवारी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट होणार आहे. त्यांच्यात चर्चा झाल्यानंतर मंगळवारी राज्यातील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होईल. या बैठकीत पर्यायी सरकार स्थापन करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे नवाब मलिक म्हणाले. निवडणुकीपूर्वी आम्ही काँग्रेससोबत आघाडी केलेली असल्यामुळे काँग्रेसशी चर्चा करूनच निर्णय होईल, या मुद्यावर मलिक यांनी भर दिला. त्यामुळे मंगळवारीच राज्यातील सत्ताकोंडी फुटेल आणि शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष राज्यपालांची भेट घेऊन संयुक्त सरकारच्या स्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा