अजित पवारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह,थकवा जाणवत असल्यामुळे मुंबईत होम क्वारंटाइन

0
121
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. अजितदादांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी त्याचे खंडन केले आहे. अजित पवार हे सध्या मुंबईच्या निवासस्थानी होम क्वारंटाइन आहेत.

 कोरोना संसर्गाच्या काळातही अजित पवार हे सक्रीय आहेत. पुण्यातील कोरोना स्थितीवर त्यांचे व्यक्तिशः लक्ष आले. अजित पवार यांना ताप आला होता. खबरदारी म्हणून त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. थकवा जाणवत असल्यामुळे त्यांनी विश्रांतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी नियोजित बैठकाही रद्द केल्या आहेत. अजित पवार हे होम क्वारंटाइन झाल्याचे समजताच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी या चर्चेचे खंडन केले आहे.

 अजित पवार हे आज सकाळी ८ ते १२ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपस्थित राहणार होते. मात्र त्यांचा हा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

 परतीच्या पावसाने राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी अजित पवार पुणे, इंदापूर, सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी पंढरपूरमध्येही पिकांच्या नुकसानीची पाहणी केली होती. हा दौरा आटोपून आल्यामुळे त्यांना थोडी कणकण जाणवत होती आणि हलका तापही होता. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली. त्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असून ते सध्या घरीच विश्रांती करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा