पंतप्रधान मोदीच नव्हे सर्व भक्तांनी सोशल मीडिया सोडणे देश हिताचे!: नवाब मलिकांचा टोला

0
57
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारपर्यंत सोशल मीडिया सोडण्याचे संकेत दिल्यानंतर देशभर चर्चा सुरू झाली आहे. काही जण मोदींनी सोशल मीडिया सोडू नये, असा सल्ला देत आहेत, तर काही जण त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत आहे. मोदींनी सोशल मीडिया सोडणे देश हिताचेच असेल, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही मोदींच्या या निर्णयावर चिमटे काढले आहेत. काल मोदींनी रविवारपर्यंत सोशल मीडिया सोडण्याचे संकेत दिले आहेत. काही नेतेही सोशल मीडिया सोडू म्हणत आहेत. जर सर्व भक्तांनीच सोशल मीडिया सोडून दिला तर देश शांत होऊन जाईल. मोदींचा निर्णय देशाच्या हिताच असेल. मोदी जो काही निर्णय घेतील, त्याचे आम्ही स्वागतच करतो, असे ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा