‘सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंजन करती है’, रूपाली चाकणकरांचा अमृता फडणवीसांवर घणाघात!

0
338
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्रिपद काही तासांत जाऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून सोशल मीडियावर राजकीय टिकाटिप्पणी करणाऱ्या अमृता फडणवीस यांना ‘सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंज करती है…’ संबोधत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी घणाघाती टिकास्त्र सोडले आहे.

तौक्ते चक्रीवादळाचे निमित्त साधून अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत राजकीय टिप्पणी केली होती. ‘तुफां तो इस शहर में अक्सर आता है, देखें अबके किसका नंबर आता है!’ असे अमृता फडणवीसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यावर रूपाली चाकणकरांनी ‘ तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है, महाराष्ट्र इसके साथ हमेशा खेला है, साथ में हिंदोस्तां को भी संभाला है!!’  असे प्रत्युत्तर दिले.

रूपाली चाकणकरांच्या या प्रत्युत्तराने अमृता फडणवीसांचे पित्त खवळले आणि त्यांनी ‘जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुडकर जवाब नाहीं देती’ अशा शिवराळ भाषेत टिप्पणी केली आणि स्वतःची तुलना वाघीणीशी केली. यावर गप्प बसतील त्या रूपाली चाकणकर कसल्या. मग त्यांनीही अमृता फडणवीसांची धुलाई केली. ‘जंगल की शेरनी शिकार करती है… सर्कस की शेरनी सिर्फ मनोरंजन!’  असा पलटवार करत चाकणकरांनी अमृता फडणवीसांची तुलना ‘सर्कशीतील वाघिणी’शी केली.

रूपाली चाकणकरांच्या या पलटवारानंतर मात्र अमृता फडणवीसांची बोलतीच बंद झाली आणि त्यांनी चाकणरांना कोणतेही प्रत्युत्तर देणे टाळले. अमृता फडणवीस आणि रूपाली चाकणकर यांच्यात रंगलेले हे ट्विटर वॉर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले असतानाच अमृता फडणवीसांनी नंतर या ट्विटर वॉरमधून माघार घेतल्याचे दिसून आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा