‘माझ्या जीवाचा धोका, प्लीज मला इथून घेऊन चला’, भाजप खासदार तडस यांच्या सुनेचा व्हिडीओ

0
350

पुणेः राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एका महिलेचा व्हिडीओ ट्विट केला आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या महिलेचे नाव पूजा आहे. ही महिला रडत असून माझ्या जीवाचा धोका आहे, प्लीज मला इथून घेऊन चला, अशी विनंती करत ती रूपाली चाकणकर यांना मदत मागत आहे. ही महिला वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांची सून असल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे.

 रुपाली चाकणकर यांनी ट्विट केलेला हा व्हिडीओ १२ सेकंदांचा आहे. या व्हिडीओत ही महिला रुपाली चाकणकर यांच्याकडे मदतीची याचना करताना दिसते आहे. मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागतेय. माझ्या जीवाला इथे धोका आहे. मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करतेय, असे ही महिला व्हिडीओत म्हणत आहे.

हेही वाचाः  चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा यांना गेली अनेक दिवसांपासून तडस कुटुंब मारहाण करून अत्याचार करत आहे. पूजाचा आताच हा व्हिडीओ माझ्यापर्यंत आला. तातडीने पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी आणि पोलिस संरक्षणासाठी पोहोचले आहेत, असे रुपाली चाकणकर यांनी हा व्हिडीओ ट्विट करताना म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा