राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाणांचा दावाः माझ्या सुनेचेच विवाहबाह्य संबंध, छळाचे आरोप खोटे

0
1287
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार विद्या चव्हाण यांच्या कुटुंबीयांवर दुसरी मुलगी झाली म्हणून सुनेचा छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विद्या चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून आपल्या सुनेचेच विवाहबाह्य संबंध आहेत, छळाचे आरोप खोटे आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

दुसरीही मुलगीच झाली म्हणून सुनेचा छळ केल्याप्रकरणी विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजीत, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्या विरोधात मुंबईच्या विलेपार्ले पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

माझ्या सुनेचेच विवाहबाह्य संबंध आहेत हे कळल्यावर माझ्या मुलाने घटस्फोट घेण्याची तयारी सुरू केली होती. त्यामुळे सुनेने आरोप केले आहेत. नवरा बायकोच्या वादात मला गोवण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे मी महिलांसाठी काम करते. मुलगा- मुलगी असा भेद आमच्या घरात होणे शक्यच नाही. ती खोटे बोलत आहे, हे लवकरच समोर येईल. खरेखोटे काय ते न्यायालयात सिद्ध होईल, असे विद्या चव्हाण म्हणाल्या.  दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी चव्हाण कुटुंबीयांचे जवाब नोंदवून घेतले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा