आ. रोहित पवारांचा कोविड सेंटरमध्ये झिंगाट ठेका, ८० वर्षांच्या आजींचीही धम्माल; पहा व्हिडीओ

0
430

अहमदनगरः कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांना मानसिक आधार देणे हा महत्वाचा उपचार ठरत असल्यामुळे राजकीय व सामाजिक विषयांवर अभ्यासपूर्ण भाष्य करण्यासाठी ओळखले जाणारे कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनीही कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. अशाच एका भेटीदरम्यान त्यांनी कोविड सेंटरमध्ये कोरोनाग्रस्तांसोबत झिंगाट गाण्यावर ठेका धरला. रोहित पवारांचा हा झिंगाट ठेका अनेकांना आश्चर्याचा धक्का देऊन गेला आहे.

 कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथे जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरला आमदार रोहित पवार यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधला आणि त्यांना धीरही दिला.

कोरोनाची बाधा झाल्यामुळे तणावात असलेल्या रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि गंभीर वातावरण हलकेफुलके करण्यासाठी गायक तुषार घोडके यांच्या गाण्याचा कार्यक्रमही याच कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आला. यावेळी तुषार घोडके यांनी झिंगाट गाणे सादर केले. या गाण्यावर कोरोनाची बाधा झालेल्या ८० वर्षीय आजींनीही ठेका धरला आणि नकळत रोहित पवारांनीही आजींसोबत या गाण्यावर ठेका धरला.

 रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातील कोरोनाग्रस्तांची नियमित विचारपूस करतात आणि तेथील परिस्थितीचा आढावाही घेतात. मतदारसंघातील कोविड सेंटर्स आणि रुग्णालयांना भेटी देऊन ते रुग्णांशी संवादही साधतात. मात्र गायकरवाडीच्या कोविड सेंटरमध्ये त्यांनी रुग्णांशी संवाद साधल्यानंतर धरलेला झिंगाट ठेका सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पहा व्हिडीओ…

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा