आपणच आमचे खरे हिरो आहात, एकत्रितपणे ही लढाई नक्की जिंकूः सुप्रिया सुळेंची भावनिक साद

0
316
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोना विषाणुच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी अहोरात्र झटणाऱे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आभार मानले आहेत. तुम्हीच आमचे खरे हिरो आहात, आपण एकत्रितपणे या संकटाचा सामना करू आणि ही लढाई नक्की जिंकू, अशी भावनिक सादही त्यांनी कोरोनाशी लढणाऱ्या सर्वांना घातली आहे.

कोरोना विषाणुचा सामना करण्यासाठी झटणारे डॉक्टर्स, परिचारिका, इतर कर्मचारी यांचे कौतुक. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य मंत्रालय ही परिस्थिती अतिशय उत्तमरित्या हाताळत आहेत. त्यांचा अभिमान वाटतो, असे खासदार सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

डॉक्टर आणि रूग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबरच पोलिस, सरकारी अधिकारी, विमानतळ व सार्वजनिक स्थळी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही खासदार सुळे यांनी आभार मानले आहेत. आपण सर्वजण आमचे खरे हिरो आहात. आपण एकत्रितपणे या संकटाचा सामना करू आणि ही लढाई नक्की जिंकू, अशी भावनिक सादही सुप्रिया सुळे यांनी घातली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा