राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८५ टक्क्यांवर, आज ६ हजार १९० नवे रुग्ण

0
50

मुंबईः राज्यात आज ८ हजार २४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १५ लाख ०३ हजार ५० करोना बाधितांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८५ टक्क्यांवर पोहोचले आहे.  

दुसरीकडे राज्यात आज ६ हजार १९० नवीन रुग्ण आढळून आले आहेत, तर १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९ लाख ०६ हजार ८२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ७२ हजार ८५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचे हे प्रमाण १८.७८ टक्के आहे.

सध्या राज्यात २५ लाख २९ हजार ४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,४११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १६ लाख ७२ हजार ८५८ झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा