औरंगाबादेत ७८ नवे कोरोना बाधित रुग्ण, तीन जणांचा मृत्यू

0
59

औरंगाबाद :  औरंगाबाद जिल्ह्यात आज ७८ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या  ४३ हजार ३७८ झाली आहे. आज तीन कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १ हजार १४८ वर पोहोचली आहे.

 दरम्यान, आज औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील २७ आणि ग्रामीण भागातील ३७ अशा ६४ कोरोना बाधितांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे.  आजपर्यंत जिल्ह्यात ४१ हजार २४० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून सध्या ९९० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज महानगरपालिका हद्दीत ६५ कोरोना बाधित रुग्ण आढळले. त्यात  बेगमपुरा १, गजानन कॉलनी, गारखेडा २, घाटी परिसर १, पैठण रोड १, चिनार गार्डन १, गुरूप्रसाद नगर, बीड बायपास १, रेल्वे स्टेशन परिसर ३, अरिहंत नगर ३, उल्कानगरी २, अन्य ४२, उस्मानपुरा १, कासारीबाजार २, नेहरू चौक १,उस्मानपुरा ३, गारखेडा परिसर १ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात १३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यात गंगापूर १, कन्नड २, अन्य १० रुग्णांचा समावेश आहे.

तीन कोरोना बाधितांचा मृत्यूः घाटीत एन सात सिडकोतील ७५ वर्षीय पुरूष, शिवशंकर कॉलनीतील ५० वर्षीय पुरूष, खासगी रुग्णालयात अपतगाव येथील ६२ वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा