भारतात आढळले २४० नवीन कोरोना स्ट्रेन, महाराष्ट्रातील स्ट्रेन जास्त घातक

0
630

नवी दिल्ली/मुंबईः महाराष्ट्रातील कोरोनाचे थैमान पुन्हा एकदा वाढू लागले असतानाच महाराष्ट्रात आढळलेला नवीन कोरोना स्ट्रेन जास्त घातक आहे. अँटीबॉडीज तयार झालेल्या लोकांनाही या कोरोना स्ट्रेनचा संसर्ग होऊ शकतो, असा इशारा एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे.

भारतात आतापर्यंत २४० नवी कोरोना स्ट्रेन आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आढळून आलेला कोरोना स्ट्रेन जास्त घातक ठरू शकतो, असे डॉ. गुलेरिया यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले. भारतात हर्ड इम्युनिटी ही केवळ कल्पनाच ठरणार आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकांमध्ये हर्ड इम्युनिटीची गरज आहे, असेही डॉ. गुलेरिया म्हणाले.

महाराष्ट्रात आढळून आलेल्या नवीन कोरोना स्ट्रेनचा विचार केल्यास हर्ड इम्युनिटी येणे अवघड दिसत आहे. या स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून तो जास्त घातक ठरू शकतो. ज्या नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत, त्यांनाही या कोरोना स्ट्रेनचा संसर्ग होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

लॉकडाऊनसाठी आठ दिवसांचा अल्टिमेटमः दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णवाढीची आकडेवारी आणि लोक शिस्तीचे पालन करतात की नाही, पाहून राज्यात लॉकडाऊन लागू करण्याबाबत आठ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता सोमवारपासून राज्यात सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर काही दिवस बंदी घालण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा